- कारल्याच बी पेर ग सुने, मग जा आपुल्या माहेरा
- झिम्मा
- फुगडी 1
- फुगडी 2
- खन्डेरायाच्या लग्नाला नवरी नटली
- लग्नाची गाणी
- लग्नाची गाणी / विहीण
कारल्याच बी पेर ग सुने, मग जा आपुल्या माहेरा
कारल्याच बी पेर ग सुने, मग जा आपुल्या माहेरा,
कारल्याच बी पेरल सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा ।।
कारल्याच वेल येऊ दे सुने मग जा आपुल्या माहेरा,
कारल्याचा वेल आला सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा ।।
कारल्याला कारल येऊ दे सुने मग जा आपुल्या माहेरा,
कारल्याला कारल आल सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा ।।
कारल्याची भाजी चीर ग सुने मग जा आपुल्या माहेरा,
कारल्याची भाजी चिरली सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा ।।
कारल्याची भाजी केली सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा,
कारल्याची भाजी खा ग सुने मग जा आपुल्या माहेरा ।।
कारल्याची भाजी खाल्ली सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा,
कारल्याच उष्ट काढ ग सुने मग जा आपुल्या माहेरा ।।
कारल्याची उष्ट काढल सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा ।।
कारलीच बी पेर ग सूनबाई
कारलीच बी पेर ग सूनबाई
मग जा आपल्या माहेरा माहेरा
कारल्याच बी पेरल हो सासूबाई
आता तरी धाडाना, धाडाना
कारल्याला पाणी घाल ग सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा
कारल्याला पाणी घातल हो सासूबाई
आता तरी धाडाना, धाडाना
कारल्याला बूड येऊ देग सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा
कारल्याला बूड आल हो सासूबाई
आता तरी धाडाना, धाडाना
कारल्याला मांडव घाल ग सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा
कारल्याला मांडव घातला हो सासूबाई
आता तरी धाडाना, धाडाना
कारल्याला फूल येऊ दे ग सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा
कारल्याला फूल आल हो सासूबाई
आता तरी धाडाना, धाडाना
कारल्याला कारल लागू दे ग सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा
कारल्याला कारल लागल हो सासूबाई
आता तरी धाडाना, धाडाना
कारल्याची भाजी कर ग सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा
कारल्याची भाजी केली हो सासूबाई
आता तरी धाडाना, धाडाना
कारल्याची भाजी खा ग सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा
कारल्याची भाजी खाल्ली हो सासूबाई
आता तरी धाडाना, धाडाना
भाजीचा गंज घास ग सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा
भाजीचा गंज घासला हो सासूबाई
आता तरी धाडाना, धाडाना
सासूबाई सासूबाई आता तरी धाडाना
मला काय पुसते पूस जा आपल्या सासर्याला
मांमाजी मांमाजी आता तरी धाडाना, धाडाना
मला काय पुसतेस पूस जा आपल्या दिराला
भाऊजी भाऊजी आता तरी धाडाना, धाडाना
मला काय पुसतेस पूस जा आपल्या जावेला
जाऊबाई जाऊबाई आता तरी धाडाना, धाडाना
मला काय पुसतेस पूस जा आपल्या नंणदेला
वन्स वन्स आता तरी धाडाना, धाडाना
मला काय पुसतेस पूस जा आपल्या पतीला
पतिराज पतिराज आता तरी धाडाना, धाडाना
घेतळी चोळी लावली पाठी जाऊन बसली नदीच्या काठी
झिम्मा
रुणझूण पाखरा जा माझ्या माहिरा ।। हू हू ।।
तिथ घराचा दरवाजा । चंदनी लाकडाचा
पेशवाई थाटाचा । त्यावरी बैस जा ।। हू हू ।।
माझ्या माहिरा अंगणी । बघ फुलली निंबोणी
गोडी दारात पुरवणी । त्यावरी बैस जा ।। हू हू ।।
माझ्या माहिरीचा । त्यावरी बैस जा ।। हू हू ।।
माझ्या माहिरीचा । झोपाळा आल्याड बांधियला
फुलांनी गुंफियला । त्यावरी बैस जा ।। हू हू ।।
माझ्या माहिरी मायबाई । डोळे लावुनी वाट पाही
तिला खुशाली सांगाया जा । माझ्या माहिरी पाखरा जा ।। हू हू ।।
फुगडी 2
१.
फुगडी खेळतां खेळतां जमीन झाली काळी
माझ्याशी फुगडी खेळते लेकुरवाळी
२.
लाही बाई लाही साळीची लाही
मुक्यानं फुगडी खेळणं शोभत नाही
३.
गणपतीच्या मागे उंदराची पिल्लं
सगुणा म्हणते तींच माझी मुलं
४.
पैंजण बाई पैंजण छुमछुम पैंजण
माझ्याशी फुगडी खेळते बुटबैंगण
५.
खार बाई खार लोणच्याचा खार
माझ्याशी फुगडी खेळते नाजुक नार
मग जा आपल्या माहेरा माहेरा
कारल्याच बी पेरल हो सासूबाई
आता तरी धाडाना, धाडाना
कारल्याला पाणी घाल ग सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा
कारल्याला पाणी घातल हो सासूबाई
आता तरी धाडाना, धाडाना
कारल्याला बूड येऊ देग सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा
कारल्याला बूड आल हो सासूबाई
आता तरी धाडाना, धाडाना
कारल्याला मांडव घाल ग सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा
कारल्याला मांडव घातला हो सासूबाई
आता तरी धाडाना, धाडाना
कारल्याला फूल येऊ दे ग सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा
कारल्याला फूल आल हो सासूबाई
आता तरी धाडाना, धाडाना
कारल्याला कारल लागू दे ग सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा
कारल्याला कारल लागल हो सासूबाई
आता तरी धाडाना, धाडाना
कारल्याची भाजी कर ग सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा
कारल्याची भाजी केली हो सासूबाई
आता तरी धाडाना, धाडाना
कारल्याची भाजी खा ग सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा
कारल्याची भाजी खाल्ली हो सासूबाई
आता तरी धाडाना, धाडाना
भाजीचा गंज घास ग सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा
भाजीचा गंज घासला हो सासूबाई
आता तरी धाडाना, धाडाना
सासूबाई सासूबाई आता तरी धाडाना
मला काय पुसते पूस जा आपल्या सासर्याला
मांमाजी मांमाजी आता तरी धाडाना, धाडाना
मला काय पुसतेस पूस जा आपल्या दिराला
भाऊजी भाऊजी आता तरी धाडाना, धाडाना
मला काय पुसतेस पूस जा आपल्या जावेला
जाऊबाई जाऊबाई आता तरी धाडाना, धाडाना
मला काय पुसतेस पूस जा आपल्या नंणदेला
वन्स वन्स आता तरी धाडाना, धाडाना
मला काय पुसतेस पूस जा आपल्या पतीला
पतिराज पतिराज आता तरी धाडाना, धाडाना
घेतळी चोळी लावली पाठी जाऊन बसली नदीच्या काठी
झिम्मा
रुणझूण पाखरा जा माझ्या माहिरा ।। हू हू ।।
तिथ घराचा दरवाजा । चंदनी लाकडाचा
पेशवाई थाटाचा । त्यावरी बैस जा ।। हू हू ।।
माझ्या माहिरा अंगणी । बघ फुलली निंबोणी
गोडी दारात पुरवणी । त्यावरी बैस जा ।। हू हू ।।
माझ्या माहिरीचा । त्यावरी बैस जा ।। हू हू ।।
माझ्या माहिरीचा । झोपाळा आल्याड बांधियला
फुलांनी गुंफियला । त्यावरी बैस जा ।। हू हू ।।
माझ्या माहिरी मायबाई । डोळे लावुनी वाट पाही
तिला खुशाली सांगाया जा । माझ्या माहिरी पाखरा जा ।। हू हू ।।
फुगडी 2
१.
फुगडी खेळतां खेळतां जमीन झाली काळी
माझ्याशी फुगडी खेळते लेकुरवाळी
२.
लाही बाई लाही साळीची लाही
मुक्यानं फुगडी खेळणं शोभत नाही
३.
गणपतीच्या मागे उंदराची पिल्लं
सगुणा म्हणते तींच माझी मुलं
४.
पैंजण बाई पैंजण छुमछुम पैंजण
माझ्याशी फुगडी खेळते बुटबैंगण
५.
खार बाई खार लोणच्याचा खार
माझ्याशी फुगडी खेळते नाजुक नार
६.
आपण दोघी मैत्रिणी गळां घालूं वेढा
गोड गोड बोलुं आपण साखरपेढा
७.
बारा वाजले एक वाजला समोर पडली आहेत उष्टी
नवरा आणि बायको बसून करताहेत गोष्टी.
८.
तुझी माझी फुगडी किलवर ग
संभाळ अपुले बिलवर ग
९.
आपण दोघी मैत्रिणी गळां घालूं मिठी
गोड गोड बोलूं आपण साखरपिठी
१०.
नमस्कार करतें आशीर्वाद द्या
लहान आहे सासूबाई संभाळून घ्या
११.
फुगडी फुलेदार भाऊ शिलेदार
नणंदा मोकाणी जावा कोल्हाटिणी.
१२.
हरबर्याचं घाटं माज्या फुगडीला दाटं
फुगडी पापा तेलणी चांफा,
सईची साडी राहिली घरीं,
बाप सोनारा नथ घडू दे,
नथीचा जोड सवती बोल,
सवत कां बोल ना,
यील मेल्या सांगीन त्येला, तुला ग मार दियाला,
बकर कापीन गांवाला, हरीख माज्या जीवाला
१३.
घोडा घोडा एकीचा एकीचा
पेठकरणी लेकीचा,लेकीचा
१४.
अशी लेक गोरी,गोरी
हळ्द लावा थोडी, थोडी
हळदीचा उंडा, उंडा
रेशमाचा गोंडा, गोंडा
गोंड्यात होती काडी, काडी
काडीत होता रुपाया, रुपाया
भाऊ माझा शिपाया , शिपाया.
१५.
शिळ्या चुलीत चाफा चाफा
नाव ठेवा गोपा, गोपा
गोपा गेला ताकाला ताकाला
विंचू लावला नाकाला
विंचवाची झाली गुळवणी गुळवणी
त्यांत माझी मिळवणी मिळवणी
मिळवणीचा रहाट ग रहाट ग
कोल्हापूरची पेठ ग पेठ ग
पेठेला लागल्या शेंगा शेंगा
अशी शेंग गोड ग गोड ग
जिभेला उठला फोड ग फोड ग
फोड कांही फुटेना फुटेना
घरचा मामा उठेना उठेना
घरचा मामा खैस ग खैस ग
त्यान घेतली म्हैस ग म्हैस ग
१६.
अरंडयावर करंडा करंडयावर मोर
माझ्यासंग फुगडी खेळती चंद्राची कोर
१७.
ओवा बाई ओवा रानोमळ ओवा
माझ्यासंग फुगडि खेळतो गणपतिबुवा
१८.
आम्ही दोघी मैत्रिणी अट्टीच्या अट्टीच्या
साडया नेसू पट्टीच्या पट्टीच्या
१९.
खोल खोल विहिरीला उंच उंच चिरे
तुझी माझी फुगडी गरगर फिरे
२०.
आपण दोघी मैत्रिणी जोडीच्या जोडीच्या
हातात पाटल्या तोडीच्या तोडीच्या
२१.
चहा बाई चहा गवती चहा
माय लेकीच्या फुगडया पहा
२२
पहा तर पहा उठून जा
आमच्या फुगडीला जागा द्या
२३.
अक्कण माती चिक्कण माती पाय घसरला
प्रेमाचा नवरा् शेला आणायला विसरला
२४.
इकडून आली तार तिकडून तार
भामाचा नवरा मामलेदार.
२५.
आपण दोघी मैत्रिणी गळां घालूं वेढा
गोड गोड बोलुं आपण साखरपेढा
७.
बारा वाजले एक वाजला समोर पडली आहेत उष्टी
नवरा आणि बायको बसून करताहेत गोष्टी.
८.
तुझी माझी फुगडी किलवर ग
संभाळ अपुले बिलवर ग
९.
आपण दोघी मैत्रिणी गळां घालूं मिठी
गोड गोड बोलूं आपण साखरपिठी
१०.
नमस्कार करतें आशीर्वाद द्या
लहान आहे सासूबाई संभाळून घ्या
११.
फुगडी फुलेदार भाऊ शिलेदार
नणंदा मोकाणी जावा कोल्हाटिणी.
१२.
हरबर्याचं घाटं माज्या फुगडीला दाटं
फुगडी पापा तेलणी चांफा,
सईची साडी राहिली घरीं,
बाप सोनारा नथ घडू दे,
नथीचा जोड सवती बोल,
सवत कां बोल ना,
यील मेल्या सांगीन त्येला, तुला ग मार दियाला,
बकर कापीन गांवाला, हरीख माज्या जीवाला
१३.
घोडा घोडा एकीचा एकीचा
पेठकरणी लेकीचा,लेकीचा
१४.
अशी लेक गोरी,गोरी
हळ्द लावा थोडी, थोडी
हळदीचा उंडा, उंडा
रेशमाचा गोंडा, गोंडा
गोंड्यात होती काडी, काडी
काडीत होता रुपाया, रुपाया
भाऊ माझा शिपाया , शिपाया.
१५.
शिळ्या चुलीत चाफा चाफा
नाव ठेवा गोपा, गोपा
गोपा गेला ताकाला ताकाला
विंचू लावला नाकाला
विंचवाची झाली गुळवणी गुळवणी
त्यांत माझी मिळवणी मिळवणी
मिळवणीचा रहाट ग रहाट ग
कोल्हापूरची पेठ ग पेठ ग
पेठेला लागल्या शेंगा शेंगा
अशी शेंग गोड ग गोड ग
जिभेला उठला फोड ग फोड ग
फोड कांही फुटेना फुटेना
घरचा मामा उठेना उठेना
घरचा मामा खैस ग खैस ग
त्यान घेतली म्हैस ग म्हैस ग
१६.
अरंडयावर करंडा करंडयावर मोर
माझ्यासंग फुगडी खेळती चंद्राची कोर
१७.
ओवा बाई ओवा रानोमळ ओवा
माझ्यासंग फुगडि खेळतो गणपतिबुवा
१८.
आम्ही दोघी मैत्रिणी अट्टीच्या अट्टीच्या
साडया नेसू पट्टीच्या पट्टीच्या
१९.
खोल खोल विहिरीला उंच उंच चिरे
तुझी माझी फुगडी गरगर फिरे
२०.
आपण दोघी मैत्रिणी जोडीच्या जोडीच्या
हातात पाटल्या तोडीच्या तोडीच्या
२१.
चहा बाई चहा गवती चहा
माय लेकीच्या फुगडया पहा
२२
पहा तर पहा उठून जा
आमच्या फुगडीला जागा द्या
२३.
अक्कण माती चिक्कण माती पाय घसरला
प्रेमाचा नवरा् शेला आणायला विसरला
२४.
इकडून आली तार तिकडून तार
भामाचा नवरा मामलेदार.
२५.
तुझ्या घरी माझ्या घरी आहे बिंदली सरी
फुगडी खेळताना बाई नको तालीवारी
लग्नाची गाणी
फुगडी खेळताना बाई नको तालीवारी
लग्नाची गाणी
हळद
1.
घाणा जी घातिला खंडीभर भाताचा
घाणा जी घातिला खंडीभर भाताचा
मांडव गोताचा दणका भारी
घाणा जी घातिला खंडीभर भाताचा
आधी मान देती कुंकवाला
आधी मान देती हळदीला
2.
घाणा भरीला । सवाखंडी सुपारी
मांडवी व्यापारी । गणराज
घाणा भरीला । सवा खंडी गहू
नवर्या मुलीला गोत बहू । गणराज
घाणा भरीला । सवा खंडी भाताचा
नवरा मुलगा गोताचा । गणराज
मांडवाच्या दारी । उभा गणपती
नवर्या मुलाला गोत किती । गणराया
मांडवाच्या दारी हळदीचे वाळवण
नवर्या मुलाला केळवण । गणरायाला
मांडवाच्या दारी । रोविल्या ग मेढी
मूळ ग वर्हाडी । आंबाबाई
मांडवाच्या दारी । कोण उभ्यान घास घेतो
चहूकडे चित्त देतो । गणराज
मांडवाच्या दारी । इथ तिथ रोवा
लोडाला जागा ठेवा । माणसांच्या
घाणा भरीला । सवा खंडी कणिक
मांडवी माणीक । आंबाबाई
3.
भवरीयो भवरीयो । परतुन जाई चवकियो
भवरीयो राजाराणी । महादेवाच्या घरी यो
पाटाच पाणी सारंगी जातो
हळदीचा लोट पारवा पितो.....
4.
हळद (लग्ना नंतर)
नवरी आहे गोरी तिला हळद लावली थोडी
लेकीच्या करता जावयाची गोडी
माझी लेक आहे खडीसाखरेची पुडी
जावयाचा मान एवढा केला कशासाठी
लेकी राजबाई तुझ्या जीवासाठी
मोहराची वाटी ठेवली बोहोल्याच्या कोना
गोरेबाई माझी तुझ्या वराला दक्षिणा
लक्ष्मी आली घरा आता तू जाऊ नको
माझ्या बाळराजाला अंतर देऊ नको
लक्ष्मीबाई आली मागच्या दारान
कडा उघडावी धाकटया दिरान
लक्ष्मीबाई आली सई सांजच्या भरात
कुंकवाची पुडी साक्ष ठेविली दारात
पहिला दिवस पुसाव चांगला
हिरव्या चोळीवर काढला बंगला
दुसर्या दिवशी मित्र पुशी सोबत्याला
का रे गडया पिवळा घरी राणीचा सोहळा
तिसर्या दिवशी माय पुसे ब्राह्मणाला
मुहूर्त चांगला हिरवी चोळी कामिनीला
चवथ्या दिवशी घर गुलालांनी लाल
पेटचा हा लाल त्याचे शांतीक झाल काल
पाचव्या दिवशी लिंबा डाळिंबाची पाटी
गोर्या राधिकेच्या जवळी बाळ निजे नवसाचा
सातव्या दिवशी ब्राह्मणाला दिली गाय
ऐकते शांतीपाठ हरखून माय
आठव्या दिवशी पत्र फुलार्याला धाडा
गोर्या राधिकेला गुंफावा जाई तोडा
नवव्या दिवशी शेजेला फुल दाट
गोर्या राधिकेन केला हा थाटमाट
दहाव्या दिवशी वाजती चौघडे
बाई हशीत खुशीत निरोप माहेराला धाडे
बहिणीच्या घरी भाऊ गेला लई दिसा
हाती बेल तांब्या बहीण पुजिती तुळसा
बहिणीच्या घरी भाऊ गेला लई दिसा
सोनियाचा गोफ कमरी करदोडयाचा फासा
बहिणीला भाऊ मोठा दुर्लभ वाटीयला
समया कारण भाऊ आला भेटायला
बहीण भावंड आहेत समस्तला
बहिणीची माया लई माझ्या ग बंधूला
बहिणीच्या घरी भाऊ करतो देऊ देऊ
बहिणीच्या आशीर्वादान माडी कळसाला जाऊ
नको भावा म्हणू बहिणींनी नासल
बहिणीच्या आशिर्वादे धनधान्य ते सायल
बहिणीच्या आशिर्वादे भाऊ झालेत कुबेर
चिरेबंदी वाडे बांधले चहुखोर
5.
आंदण देई रे भाऊराया
काय देऊ ग बहिणी बया
वासरासहित पाची गाया
आंदण देई रे भाऊराया
काय देऊ ग बहिणी बया
ऊसा सहित पानमळा
आंदण देई रे भाऊराया
काय देऊ ग बहिणी बया
बहिण परिस लेकीची माया
आंदण देई रे भाऊराया
लग्नाची गाणी / विहीण
1.
विहीणबाईची करणी बघा मग बंधूला लेक मागा
विहीण मागते थोड थोड नवर्या बाळाला कंठी तोड
त्या ग कंठीच सोन फिक्क बंधु कंगण्या जोग रुप
त्या ग कंगण्या पडल्या काळ्या बंधु आणा हो वेलबाळ्या
वेलबाळ्याला बाजूबंद चोळी पातळ मला दंड
त्या ग पातळाची निरी निरी रुतते माझे पोटी
बंधू आणा हो लाल लाल दाटी
लाल लाल दाटीचा पिवळा सर
बंधु लावा वो वर भिंग
2.
अहो अहो विहीणबाई
आमचे मागणे काही नाही
आमचे मागणे थोडे थोडे
नवर्या मुलीला पैंजणतोडे
पैंजण जोडव्यांची हौस फार
नवर्या मुलीला चद्रहार
चंद्रहाराची हौस मोठी
नवर्या मुलीला चिंचपेटी
चिंचपेटीला मोती थोडे
नवर्या मुलीला हत्तीघोडे
हत्तीघोडयावर बसती
गावाकडे दोघे जाती
आई पाहते खिडकीतून
बाप पाहतो दारातून
भाऊ पहातो ओटयावरुन
हरणी गेली कडल्यातून
ज्याची होती त्यान नेली
आमची माया वाया गेली
3.
विहीणबाई, विहीणबाई, राग मनातला सोडा
गोरी गोरी वरमाय
तिचे नाजुक पिवळे पाय
गव्हा तांदळान भरल्या कोठया
खोबर्या नारळान मी भरीते ओटया
खणा नारळान मी भरीते ओटया
विहीणबाई राग मनातला सोडा
जेवण झाल्यावर हात चोळते साखरीन
दात कोरते लवंगान
घंगाळी रुपये तुम्ही घाला
विहीणबाई राग मनातला सोडा
रेशमी पायघडयावरुन मिरवा
विहीणबाई राग मनातला सोडा
मोठया लोकांचा नवरदेव सासरी रुसला
कंठी गोफासाठी जानोसी बसला
नवरदेवाच्या जोरावर सवाष्णी मागती जानोसा
चिरेबंदी वाडा त्यात जोडीनी हो बसा
[ श्रेणी : मराठी लोकगीत। रचनाकार : अज्ञात ]